इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीची अतोनात असे नुकसान झाले आहे. झालेले नुकसान पाहता माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
मागील दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून अद्यापही पावसाचे वातावरण आहे.
या विषयी बोलताना आमदर भरणे म्हणाले की, मागील दोन-चार वर्षांपासून वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे मात्र शेतकर्यांपुढे नवे संकट उभारले असून ऊस, डाळिंब, केळी,पेरी, द्राक्षे यासारख्या फळबागांचे खूप मोठे नुसनान झाले आहे. सध्या शेतमालाची कवडीमोल दराने विक्री होत असल्याने आधीच शेतकर्यांना खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यातच अशा अवस्थेत अवकाळी पावसाने शेतकरी अजून अडचणीत आणले आहे.त्यामुळे शासनाकडून तात्काळ मदत मिळणे अत्यावश्यक असल्याने जिल्हाधिका-यांनी ताबडतोब नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी सुचना दिल्या असल्याचे श्री.भरणे यांनी सांगितले आहे.