इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): पश्र्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पात डोळे विस्फारून टाकणारा 45,03,097 कोटीचा बजेट जलाओ आंदोलन होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या दि.10 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वा.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बजेट जलाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब भोंग यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

गतवर्षीच्या बजेट पेक्षाही चालूवर्षी कमी बजेट सादर करुन भारतीय जनतेला फसविण्याचे कार्य मोदी सरकारने केले आहे. जसे की मागील वर्षी शिक्षणावर 2.64% व या वर्षी 2.51% आरोग्यावर 2.20% या वर्षी 1.98%, शेतीवर 3.84% या वर्षी 3.20%, ग्रामीण विकास वर 5.81% या वर्षी 5.29% प्रधानमंत्री फसल बिमा योजनेवर 15,500 करोड तर या वर्षी फक्त 13,625 करोड, म.न.रे.गा. योजनेवर मागील वर्षी 73,000 करोड तर या वर्षी मात्र फक्त 60,000 करोड, प्रधानमंत्री सन्मान निधी वर मागील वर्षी 68,000 करोड तर या वर्षी फक्त 60,000 करोड, एग्रीकल्चर फर्टीलायझर वर मागील वर्षी 2,25,000 करोड़ तर या वर्षी फक्त 1,75,000 करोड, अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय मागील वर्षी 5,020 करोड तर या वर्षी 3,017 करोड घोषित केलेले आहे.
सन 2011 च्या जनगननेप्रमाणे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी 16.6 टक्के लोकसंख्येनुसार 16.6 टक्के तरी निधी मिळाला पाहिजे होता किंवा सरकारने 15.5 टक्के आरक्षण दिले या प्रमाणात तरी म्हणजे 15.5 टक्के तरी निधी दिला पाहिजे होता. तसे न करता सरकारने फक्त 3.54 टक्के निधी दिला आहे. 30 हजार 475 कोटीचा निधी लक्ष्याधारित योजनांसाठी म्हणजे अनुसूचित जाती व जमाती, अल्पसंख्यांक, ओबीसींवर अन्याय करणारा अर्थसंकल्प केलेला आहे. यामुळे या प्रवर्गातील मुलांना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचण येणार आहे.
या बजेट मध्ये एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गासाठी कोणतीही विशेष तरतुद करण्यात आलेली नाही. कष्टकरी शेतकरी, कामगार, युवा, बेरोजगार व महिलांच्या विकासाचा नावावर फसविले जात आहे. संविधानिक हक्क अधिकारापासून वंचित केले आहे यासर्व बाबींचा विचार करून भारतीय जनतेच्या मनामध्ये या सरकारचा बजेट विरोधात आक्रोश निर्माण झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात संविधान चौक येथे बीएमपी जिल्हाध्यक्ष अनिल बोडके यांच्या नेतृत्वाखाली बजेट जलाओ आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे येथे होणारे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल मखरे, राज्यध्यक्ष श्रीकांतदादा ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अमोल लोंढे, समीक्षा प्रभारी पश्चिम महाराष्ट्र नानासाहेब चव्हाण, महिला आघाडी अध्यक्ष सुनीता कसबे, महिला प्रभारी वैशाली राक्षे व इतर मान्यवर उपस्थिती राहतील.
निवेदन जिल्हाधिकारी महोदय मार्फत मा.राष्ट्रपती महोदयांना सादर करण्यात येणार अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब भोंग यांनी दिली.