इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): संस्काराचे व्यासपीठ, जनतेबाबत असणारी तळमळ व विनम्र स्वभाव असणारे माजी खासदार कर्मयोगी शंकररावजी पाटील यांची 99 वी जयंती साजरी करण्यात आली.
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर महाविद्यालयातील श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. राजकारणात व समाजकारणात काम करणार्या तरूणांनी लोकाभिमुख काम करणार्या शंकरराव पाटील यांचा आदर्श घेण्याची नितांत गरज आहे.
यावेळी मोठ्या संख्येने कर्मयोगी परिवारातील सदस्य उपस्थित होते. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी कर्मयोगींच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. श्री.नारायणदास रामदास हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक यांनी यावेळी भक्तीभावाने भजन गायले.