अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी श्रीराजभैय्या भरणे धावले..

अशोक घोडके…
इंदापूर(प्रतिनिधी): अपघातग्रस्तांना मदत करणार्‍यांमध्ये प्रोत्साहन येण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. आज शेळगाव उड्डाणपूलाठिकाणी झालेल्या अपघातात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपूत्र श्रीराज भरणे यांनी माणुसकीचे दर्शन दाखविले ते इतरांना आदर्श ठरत आहे.

इंदापूर बारामती पालखी महामार्गावर शेळगाव उड्डाणपूलयठिकाणी दोन मोटरसायकली समोरासमोर आल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये जावेद अकबर पठाण (रा.शेळगाव) दुसरी व्यक्ती राजू लोखंडे (रा.शिरसटवाडी) या व्यक्तींना जबर मार लागला असून इंदापूर रोडवर एकही गाडी न थांबल्याने अपघातग्रस्त त्याच ठिकाणी एक तास रोडवर पडून होते त्यानंतर राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भैय्या भरणे हे इंदापूर वरून येत असताना त्यांनी त्या अपघातग्रस्तांना तात्काळ स्वत:च्या गाडीमध्ये बसवून उपचारासाठी बारामतीकडे नेले.

राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात महामार्गाचे जाळे निर्माण झाले आहे. प्रतिवर्षी अपघातात मोठी वाढ होत असून अपघातात मृत्यू पावार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे शासनाने अपघातानंतर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणार्‍यांसाठी प्रोत्साहनपर योजना सुरू केली असुन यामुळे वेळीच मदत मिळून अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी मोठी मदत होईल.

आज श्रीराजभैय्या यांनी केलेली अपघातग्रस्तांना मदतीमुळे इतर मदत करणार्‍या युवकांना आदर्श ठरून त्यांच्यामध्ये प्रोत्साहन निर्माण होईल व तात्काळ उपचार यापुढे त्यांना मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!