बारामती(वार्ताहर): 13 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता बारामती भाजप कार्यालयाच्या बाहेर रोड लगत असणार्या फलकावर व कार्यालयाच्या फलकावर काळा रंग टाकणार्या सचिन नानासोा जगताप (वय-38, रा.प्रतिभानगर, आमराई, बारामती) यास बारामती येथील मे.कोर्टात जामीन मंजूर झाला.
सचिन जगताप सह साथीदारावर भादवि कलम 153 ,505 ,427 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)( 3 )चे उल्लंघन झाले म्हणून 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलने व प्रति आंदोलने याच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या बोर्डवर काळा रंग टाकल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीच्या लोकांमध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी व दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी त्यांनी हा रंग टाकून व्हिडिओ काढून प्रसारित केला. त्यातून सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न केला होता.
मे.कोर्टात सचिन जगताप यांचेवतीने ऍड.धीरज लालबिगे, ऍड.वैभव काळे, ऍड.विवेक बेडे, ऍड.बाबाजान शेख, ऍड.रियाज खान, ऍड.अजित बनसोडे, ऍड.विशाल गव्हाळे, ऍड.अमोल सोनवणे, ऍड.बापूसाहेब शिलवंत, ऍड.किरण सोनवणे, ऍड.स्वरूप सोनवणे, ऍड.सोमनाथ पाटोळे, ऍड.पोंदकुले, ऍड.रविंद्र अवघडे, ऍड.अक्षय जाधव, ऍड.वैभव शेलार, ऍड.कमाल मुलाणी, ऍड.किशोर मोरे, ऍड.संदीप बनसोडे, ऍड.अक्षय शितोळे, ऍड.सुनिल शिंदे यासर्वांनी बाजू मांडली.