बारामती(वार्ताहर): लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तु.च. महाविद्यालयात युवती मेळावा व महाविद्यालयीन युवतींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळावा व शिबीराचे आयोजन राष्ट्रवादी युवती कॉग्रेस बारामती शहर अध्यक्षा सौ.आरती शंकर गव्हाळे (शेंडगे) यांच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी बारामती विकास पेटर्न राष्ट्रवादी पुन्हा या व्हिडिओ सॉंगचे चित्रीकरणाचे प्रकाशन महाविद्यालयाचे सचिव राहुल वाघोलीकर व राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सक्षणा सलगर यांनी आरती गव्हाळे यांचे कौतुक करीत युवतींनी राजकारणामध्ये येण्याचा सल्ला दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आरती शेंडगे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटील, राहुल वाघोलीकर, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस तालुकाध्यक्षा सौ.वनिता बनकर, शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, शहर युवकाध्यक्ष अविनाश बांदल, शहर युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव, माजी नगराध्यक्षा सौ.भारती मुथा, भगिनी मंडळ अध्यक्षा सुनिता शहा, राणी जगताप, ऍड.सुप्रिया बर्गे, रोहिणी खरसे, बारामती शहर युवती उपाध्यक्ष कविता वाघमारे, महेक शेंडगे, वृषाली, रेश्मा शेंडगे, सुप्रिया शेंडगे, प्रिया चौरे, हाफिजा आयशा शेख, ज्योती जाधव इ.उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व डॉ.काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.