अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): शेळगाव येथील श्री संत मुक्ताबाई विद्यालयात तालुकास्तरीय खो खो क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा आमदार मा दत्तात्रय भरणे व आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते व सरपंच रामदास शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
याप्रसंगी छत्रपतीचे संचालक ऍड.लक्ष्मण शिंगाडे, स्कूल कमिटीचे सदस्य साहेबराव शिंगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, पोलीस उप निरीक्षक धुळाजी कोळपे, इंदापूर तालुका क्रिडा अधिकारी महेश चावले, भैरवनाथ सोसायटीचे व्हा.चेअरमन उमेश ननवरे, भजनदास पवार, उमेश ननवरे, सोपान माने, भिवा जाधव, वैभव शिंगाडे, प्रताप चवरे, रसूल शिंदे, सरपंच नाना रावण, मुख्याध्यापक कांबळे सर, पोलीस पाटील उषा वाघमोडे, पवार सर, कैलास जाधव सह ग्रामस्थ, खेळाडू, शिक्षक उपस्थित होते.