बारामती(वार्ताहर): राज्यातील पोलीस अधिक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांची हिंगोली याठिकाणी बदली झाल्याने त्यांच्या जागी आनंद भोईटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली खून, चोर्या, दरोड्यांसह क्रिप्टो करन्सी, बोगस पोलीसाच्या मुसक्या आवळणे, अपघात करून पळून जाणारे, हनी ट्रॅपच्या माध्यमातून खंडणी मागणारे, जादू टोना करणारे, भाईगिरी करणारे इ. गुन्हे दाखल करून लोकांमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करणारे आनंद भोईटे आहेत. शांत व संयमी स्वभावाने ते प्रचलित आहेत.
मध्यंतरी पावसाने संपूर्ण रस्त्याची चाळण झाली होती त्यामध्ये पडलेले खड्डे यामुळे अपघात होऊन एखाद्याचा जीव जावू शकतो या भावनेतून त्यांनी स्वत: रस्त्यात उभे राहून भलामोठा खड्डा बुजवून एक सामाजिक कर्तव्य बजावले. यामधून पोलीस फक्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे व गुन्हेगारांना सजा देणारे नसून सामाजिक बांधिलकी सुद्धा जपणारे आहेत हे त्यांनी यामधून दाखवून दिले आहे.