अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (प्रतिनिधी): बिका हुआ पत्रकार, डरा हुआ विपक्ष और मुर्दा आवाम तीनों लोकतंत्र के लिए घातक है असा मौलिक संदेश देणारे पद्मभूषण, पद्मविभूषण भारतरत्न अशा विविध पुरस्काराने देश-विदेशात सन्मानीत झालेले भारताचे मा.राष्ट्रपती मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची 91 वी जयंती निमगांव केतकी (ता.इंदापूर) येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून करण्यात आली.
इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराबरोबर वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना वह्या व फळे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी समाजभूषण डॉ.लक्ष्मण आसबे, पोपट (नाना) पवार, सिकंदर मुलाणी, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन मुलाणी पै.अस्लम मुलाणी, जाकिर मुलाणी, पै.मुस्सा पठाण इ. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
इंदापूर अकलूज नाका या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. इंदापूर येथील मूकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व फळांचे वाटप करण्यात आले. श्री केतकेश्वर मंगल कार्यालय निमगाव केतकी या ठिकाणी रक्तदान शिबिरचे उद्घाटन करून 117 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले.
इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रशीद मुलांणी, युवक संघटनेचे अध्यक्ष समीर मुलाणी, कार्याध्यक्ष बबलू पठाण, युवक संघटनेचे कार्याध्यक्ष रहिमान शेख यांच्यासह मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टचे व मुस्लिम युवक संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी धनंजय देशमुख, आयाज शेख, लक्ष्मण आसबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मक्तार मुलाणी यांनी केले. सूत्रसंचालन श्री.आव्हाड यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन भिगवणचे सलमान शेख यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टचे व मुस्लिम युवक संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकार्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.