भावनिक साद घालीत युवकाचे प्राण वाचविण्यात बारामती शहर पोलीस, पोलीस मित्र व समाजसेवकांना यश

बारामती(वार्ताहर): पोलीस मित्र असतात, संकटकाळी पोलीसांची मदत संकट टळण्यासाठी खुप महत्वाची असते याची प्रचिती आमराई येथील मद्यधुंद युवक घरात किरकोळ भांडणे करून चक्क डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या छतावर आत्महत्या करण्यास चढला त्यास भावनिक साद घालीत बारामती शहर पोलीस, पोलीस मित्र व समाजसेवकांना यश आले.

दिनेश हनुमंत मिसाळ (वय 22 वर्षे) याचे घरात आईसोबत किरकोळ वाद झाल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम च्या पिडीसी बँकच्या बाजूने छतावर आत्महत्या करण्यास चढलेला होता. आजुबाजूला गर्दी झाली होती. बारामती शहर पोलीसांना याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी तातडीने पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी बीट मार्शल व संपूर्ण गुन्हे तपास पथकाला तात्काळ घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. पोलीसांनी सदरची परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळत या युवकास भावनिक साद घालीत खाली उतरण्याचे आवाहन केले. मद्यधुंद युवक असल्याने एवढ्या उंचीवरून त्याला परत उतरणे जिकीरीचे होते. तोल गेला असता तर दुर्घटना घडली असती. अग्निशमन दलास प्राचरण करण्यात आले होते. मात्र, तत्पुर्वी पोलीस, पोलीस मित्र व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने त्यास खाली आणण्यामध्ये यश आले व त्या युवकास कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, पोलीस कर्मचारी शेख पो.ना. शिंदे, देवकर यांनी केलेली आहे. यावेळी मंगलदास निकाळजे, रविंद्र सोनवणे व नगरपालिका कर्मचारी मोहन शिंदे यांनी पोलिसांना सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!