बारामती(वार्ताहर): एमपीएससी व युपीएससी या स्पर्धेत भाग घेणार्या गरजु परिक्षार्थिंना लाभ घेता येतील अशी अत्याधुनिक पुस्तकांच्या ग्रंथालयाचे उद्घाटन बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रा.अनंता पंढरीनाथ शेटे व सौ.निर्मला अनंता शेटे यांनी पार्वती पंढरीनाथ शेटे तसेच पार्वती रघुनाथ भगत यांच्या स्मरणार्थ सुमारे 60 हजार रूपये किंमतीच्या दान केलेल्या पुस्तकांच्या ग्रंथालयाचे उद्घाटन झाले.
प्रा.शेटे यांचा या ग्रंथदानानिमित्त श्री.इंगळे यांच्या शुभहस्ते सत्कार कण्यात आला.
यावेळी गणेश इंगळे यांनी मनोगतातून आपले अनुभव व्यक्त केले. प्रा.शेटे यांनी सत्कारास उत्तर दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी यांनी केले. सुत्रसंचालन गणेश देव व सदानंद करंदीकर यांनी केले तर शेवटी आभार सौ.मंगल बोरावके यांनी मानले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.