लाखेवाडी सोसायटीवर राष्ट्रवादीच्या जयभवानी पॅनलचा झेंडा : श्रीमंत ढोलेंच्या नेतृत्वाखाली विरोधकांना केले धोबीपछाड

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यामध्ये नावलौकिक असलेल्या लाखेवाडी येथील सोसायटीवरती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने एक हाती वर्चस्व मिळवून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे.

24 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडून त्याचा निकाल ही जाहीर करण्यात आला. यावेळी लाखेवाडी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत जयभवानी माता पॅनलने श्रीमंत ढोले यांच्या नेतृत्वाखाली 11-2 ने विजय मिळवून विरोधकांना धोबीपछाड केले.

जयभवानी माता पॅनेलचे संदीप तुकाराम साबळे, चांद आमीन मुलाणी, शिवाजी नाना गायकवाड, राजश्री सुभाष थोरवे, आशा शहाजी शिंगाडे, विलास नारायण खाडे, महादेव पांडुरंग खुरंगे, गणेश शिवाजी चव्हाण, केशव सोपान ढोले, विठ्ठल अर्जुन थोरवे, लक्ष्मीकांत नामदेव नाईक तर विरोधी पॅनलचे विठ्ठल नामदेव जाधव, वसंत तुकाराम नाईक हे दोन उमेदवार निवडून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!