बारामती(वार्ताहर)ः येथील मानाचा पहिला गणपती श्री अखिल मंडई मंडळ ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बा.न.प.चे माजी बांधकाम सभापती सत्यव्रत अर्जुनराव काळे यांच्यावतीने आयोजित महाप्रसादाचा भाविक भक्तांनी आनंद लुटला.
याप्रसंगी बा.न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे, माजी नगरसेवक ऍड.सुभाष ढोले, आण्णा आटोळे, संस्थापक अध्यक्ष रविंद्र धालपे, निलेश धालपे, महावीर जवारे, मंगेश पवार, सुधीर वाडेकर, ओंकार राऊत, चेतन वाडेकर, अशिश घोरपडे , मयुर नगरकर, सोमनाथ धनराळे, अक्षय मोरे,गणेश बहादूरकर इ. मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सत्यव्रत काळे गेली 10 वर्षापासुन गणेशोत्सवात महाप्रसादाचा कार्यक्रम घेत आलेले आहे. प्रसाद तयार होण्याच्या दरम्यान ढोल-ताशा पथकाच्या वादनाने वातावरण निर्मितीही झाली होती. प्रसाद तयार होताच गणपती बाप्पाचा जयघोष करण्यात आला. आरतीनंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले आणि मोठ्या संख्येने नागरीक भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.