क्रांती दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

बारामती(वार्ताहर): क्रांती दिनाच्या आठवणींचा उजाळा करण्यासाठी बारामतीकरांच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिन स.11 वा हुतात्मा स्तंभ वंदे मातरम्‌ चौक (भिगवण चौक) याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना क्रांती दिन साजरा करीत आलेली आहे.

यावेळी प्रांत, तहसिलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, मा.नगराध्यक्षा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सरकारी व निमसरकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेशभाई कोठारी यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच संघटनांचे कार्यकर्ते, कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बारामती नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, तहसिल, प्रांत व पोलीस दलाने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!