माजी राज्यमंत्र्यांकडून सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हॉईस चेअरमन व संचालकांचा सत्कार

अशोक घोडके यांजकडून….
इंदापूर(प्रतिनिधी): डाळज येथील कार्यकारी सेवा सोसायटी व हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटी या दोन्ही सोसायटीच्या निवडणुका डी.एन.काका जगताप व डाळज नंबर 1,2,3 चे विद्यमान सरपंच विकास (आप्पा) कुंभार व दादासो गलांडे सतीश हगारे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.

या निवडणुकीमध्ये सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला असून डाळज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमनपदी रामदास जगताप व व्हॉईस चेअरमनपदी सुमन वाकळे यांची बिनविरोध निवड झाली. तर हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र गलांडे, व्हॉईस चेअरमनपदी दत्तात्रय पवार यांची यांची बिनविरोध निवड झाली. सर्व संचालक मंडळाने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित सर्व नवनिर्वाचित चेअरमन व्हाइस चेअरमन व संचालक यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळांनी दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथून पुढील कारभार चालवू असे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!