अशोक घोडके यांजकडून..
इंदापूर (प्रतिनिधी): गोतंडी (ता.इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबातील अजय रोहिदास कांबळे (वय-28 वर्षे) यांचे अल्पश: आजाराने राहते घरी दु:खद निधन झाले.
अजय कांबळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. सर्वांच्या सुख दु:खात धीर देण्याचे काम ते करीत होते. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेऊन कामे मार्गी लावीत होते. त्यांच्या या स्वभावामुळे अजय कांबळे यांचे नाव गोतंडी परिसरात प्रचलित झाले होते. त्यांच्या जाण्याने गोतंडी परिसरात शोककळा पसरली आहे.
त्याच्या पश्र्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.