अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): येथील राजकारणात नावलौकीक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापराव उर्फ रामभाऊ पाटील यांच्या शोक सभेचा कार्यक्रम इंदापूर पंचायत समिती हॉलमध्ये घेण्यात आला.

रामभाऊ पाटीलांनी इंदापूर पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पद, लासुर्णे गावचे सरपंच पद व इतर ही संस्थांची अनेक संचालकपदं भुषविली. भाऊंची इंदापूर तालुक्याच्या राजकारणात 1990 ते 2010 पर्यंत खुप मोठी छाप राहीली होती. नंतर 2021 ची ग्रामपंचायत निवडणुक 17-00 अशी निवडून आणली होती. त्यांच्या कुटुंबातील अमोल पाटील हे त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत.
यावेळी राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,विलास वाघमोडे, शशिकांत तरंगे, हनुमंत बंडगर, शिवाजी इजगुडे, शिवाजी तरंगे, महेंद्र रेडके, अमोल पाटील, हेमंत पाटील, अशोक चोरमले, बापू आरडे, आप्पा माने, गोतंडी गावचे माजी चेअरमन आप्पा पाटील, अक्षय कोकाटे, सिताराम जानकर, व इंदापूर तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.