’गुरुपूजनाने गुरुपौर्णिमा साजरी : देशपांडे विद्यालयाचा अभिनव उपक्रम
बारामती(वार्ताहर): आई, वडिल व गुरूंच्या आशिर्वादाने सुसंस्कारीत जीवन घडत असते असे प्रतिपादन मएसो चे कै.ग.भि. देशपांडे विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेद सय्यद यांनी केले.
मएसो चे कै.ग.भि. देशपांडे माध्य.व उच्च माध्य. विद्यालयात गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री.सय्यद बोलत होते.
सय्यद पुढे म्हणाले की, गुरुविना जीवनाला अर्थ नसतो. प्रत्येकाचे जीवन गुरूमुळे उजळत असते असे म्हणून त्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्ते प्रकाश कोकणी यांनी गुरुपौर्णिमा या दिवसाचे महत्व त्यांच्या मनोगतातुन व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषणे केली. संस्थेचे पदाधिकारी यांनीही गुरुपौर्णिमेच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
आषाढ महिन्यामध्ये येणारी गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरी करतात. या दिवशी आपण आपल्या गुरूंना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. भारतीय संस्कृती व परंपरा यांची जपणूक व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी सर्व शिक्षक- शिक्षिका यांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देवून विद्यार्थ्यांनी पूजन केले व आशीर्वाद घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याधापक यांनी गुरुपौर्णिमा साजरी करताना आपण आपले आई, वडील, गुरु यांचे नेहमी आशिर्वाद घ्यावेत.या आशिर्वादाने आपले सुसंस्कारीत जीवन घडत असते.
गुरूपौर्णिमा कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या पाचही विभागात साजरा करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयाचे उपमुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे, पर्यवेक्षक राजाराम गावडे, चंदु गवळे, शेखर जाधव व सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणपत जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रज्ञा पोटेगावकर यांनी केले.