बँकेत पारदर्शक काम करा, कर्मचार्‍यांचे हित जपा सर्व सहकार्य केले जाईल – मा.मंत्री हर्षवर्धन पाटील

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): बँकेत पारदर्शक कामकाज करा, कर्मचारी वर्गाचे हित जपा असा सल्ला देत बँकेत सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही संचालक मंडळास सत्कार प्रसंगी मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वालचंदनगर सहकारी बँक लि.वालचंदनगरच्या सन 2022-27 करिता निवडून आलेल्या सर्व 12 नूतन संचालकांचा सत्कार बावडा येथे रत्नाई निवासस्थानी रविवारी (दि.10) करण्यात आला. यावेळी श्री.पाटील शुभेच्छा देताना बोलत होते.

याप्रसंगी इंदापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष सत्यशील पाटील, वालचंदनगर ग्रा.पं.चे सरपंच कुमार गायकवाड, विश्वजित तावरे, उपसरपंच संजय नकाते, संतोष कदम, राहुल बावडेकर, अनिल शहा, सचिन चव्हाण, माजी उपसरपंच दयानंद झेंडे, सचिन अचलारे, निलेश गुळवे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

वालचंदनगर सहकारी बँक लि. वालचंदनगर या नावाजलेल्या बँकेच्या संचालक मंडळासाठी शनिवारी (दि.9) झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी सहकारी पॅनलचे संतोष हनुमंत गायकवाड, विठ्ठल नामदेव चव्हाण, शरद अर्जुन चव्हाण, संदीप परशुराम फाळके, संजय नारायण भरते, शशांक मधुकर माडगे, राजेंद्र सूर्यजी रणमोडे, विजय शिवाजी अर्जुन, विजय सोपान म्हस्के, जीवन लक्ष्मण भोरे, सौ.राजलक्ष्मी विष्णू दळवी व सौ.पार्वती गोविंद बनसोडे हे सर्व 12 उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या विजयी नूतन संचालकांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!