बारामती(वार्ताहर): तांदुळवाडी येथील गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेले रेल्वे क्रॉसिंग गेट उघडण्याची मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे वतीने बारामती रेल्वे प्रशासनास निवेदन देवून करण्यात आली आहे. अन्यथा रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड.विनोद जावळे यांनी दिला आला आहे.
क्रॉसिंग गेट बंद असल्याने विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, रुग्ण यांना बारामती शहराच्या दिशेने ये-जा करणेसाठी विनाकारण 3 कि.मी अंतरावरून वळसा घालून जावे लागत आहे. गेट बंद असल्याने नागरीकांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
गेट बंद असल्याने काही नागरिक धोका पत्करून रेल्वेलाइन क्रॉस करीत असतात. यामुळे गेट लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. भुयारी मार्गाचे रखडलेले काम पूर्ण करावे अन्यथा मनसेचे वतीने बारामती -पुणे रेल्वे मार्गावरती रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड.विनोद जावळे, जिल्हा सचिव मयूर जाधव, बारामती शहराध्यक्ष ऋषिकेश पवार, उपशहराध्यक्ष चंद्रकांत भोसले, तालुका उपाध्यक्ष संग्राम जाधव, तालुका संघटक निलेश कदम इ. कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.