बारामती(वार्ताहर): साधु संत येती दारा, तोची दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणे बारामती येथील भिगवण चौकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी कै.वस्ताद बाजीराव काळे तालीम दहिहंडी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.ऋतुराज अर्जुनराव काळे यांनी लावलेला फ्लेक्स लक्षवेधी ठरला.
सध्या राजकारणात सुरू असलेली धुमाकूळीमुळे कार्यकर्ते सुद्धा बुचकळ्यात पडलेले आहेत. मात्र, बारामतीत खा.शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, खा.सुपिया सुळे व एन्व्हॉर्लमेंटल ऑफ फोरमच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार यांचे फ्लेक्स लावून कार्यकर्त्यांमध्ये पवार कुटुंबियांबाबत असणारे प्रेम कदापिही कमी होणार नाही. देशात व राज्यात कितीही घडामोडी झाल्या तरी पवार कुटुंबियांवरील बारामतीकरांचे प्रेम किंचीतही कमी होणार नाही असे डॉ.ऋतुराज काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
या फ्लेक्सवर उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे विश्र्वासू मा.ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांचा सुद्धा फोटो टाकण्यात आला होता.
काळेनगर याठिकाणी फुरसुंगीचे उद्योगपती प्रविणदादा हरपळे, माही दिंडी निवृत्तीबुवा चोपदार या दोन दिंडीला दरवर्षीप्रमाणे मिष्टान्न भोजनाची सोय करण्यात आली होती. वारकर्यांनी भोजनाचा अस्वाद घेतल्यानंतर ब्लॅकेट वाटप करण्यात आली. दिंडी प्रमुखांनी डॉ.ऋतुराज काळे यांचा श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी कै.वस्ताद बाजीराव काळे तालीम दहिहंडी संघाचे कार्यकर्ते, काळे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.