अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): येथील बाभूळगावातील बंदिस्त जिमसाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सात लाख रूपयांचे साहित्य दिल्याने गावामध्ये सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
यासाठी बाभुळगावच्या सरपंच शैला सोमनाथ जावळे यांनी पाठपुरावा केला होता. या मागणीचा विचार करून राज्यमंत्री भरणे यांनी त्वरित सात लाख रुपयांचे साहित्य बाभूळगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून युवकांना दिले आहे.
यावेळी बोलताना सरपंच शैला सोमनाथ जावळे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांचे आभार मानले आहेत. तसेच या साहित्यांचा फायदा तरुण वर्गाने करून घेत नियमितपणे व्यायाम करून आपले शरीर सुदृढ व निरोगी बनवावे असा सल्ला दिला आहे.