वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षातर्फे रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती(वार्ताहर): वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी इतर सलग्न संघटना यांच्या सहकार्याने भव्य आरोग्य व रक्तदान शिबीराचे आयोजन स्व.माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढी याठिकाणी करण्यात आले होते.

सदर शिबीराचे उद्घाटन शिवसेना बारामती विभागप्रमुख रंगनाथ निकम व महिला आघाडीच्या सौ.कल्पना काटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बारामती तालुका प्रमुख विश्वास मांढरे, शहरप्रमुख वस्ताद पप्पु माने, युवासेना अध्यक्ष निखील देवकाते इ. मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ भिलारे, उपजिल्हाप्रमुख ऍड.राजेंद्र काळे, बाळासाहेब शिंदे, उपतालुका प्रमुख सुभाष वाघ, बारामती विधानसभा विभागप्रमुख निलेश मदने, युवासेना उपाध्यक्ष युवराज जगताप तसेच सर्व शाखाप्रमुख व पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

सदर कार्यक्रमाचे आयोजनासाठी वैद्यकीय मदत कक्षाचे बारामती लोकसभा संपर्क प्रमुख आदिराज कोठाडीया, बारामती संपर्क प्रमुख महेश निंबाळकर, तालुका समन्वयक सौ.सारीका आटोळे,सौ.सुनिता खोमणे, सौ.संगीता खोमणे, जया गुंदेचा, कु.जोत्स्ना सोलणकर, कु.प्रज्ञा काटे, डॉ.सतिश गावडे, डॉ.विजय आटोळे, मोतासिम झैदी तसेच वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रसिद्धी समन्वयक प्रशांत गव्हाणे व सहसंपर्क समन्वयक सुदर्शनजी होळकर या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!