बारामती(वार्ताहर): येथील रॉक ऑन व्हील स्केटिंग ऍकॅडमीचा श्र्लोक अभिनंदन दोशी याने सलग 96 तास स्केटींग करून दरवर्षी प्रकाशित होणारे जगातील सर्व किर्तीमान व्यक्तींच्या विश्र्वविक्रमांच्या सविस्तर माहितीचे संकलन केलेल्या गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉडर्स नोंद घेतल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
बेळगांव येथे शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आयोजित सलग 96 तास स्केट्स मोटो फॉर्मशनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण देशातून 490 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. रॉक ऑन व्हील स्केटिंग ऍकॅडमीच्या 24 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

श्र्लोक वयाच्या चार वर्षांपासून स्केटिंग खेळत आहे. वेगवेगळ्या स्पर्धेत तो सहभागी होऊन त्यात प्राविण्य मिळवीत आलेला आहे. आता तर त्याने सलग 96 तास स्केटिंग करून एक नवा विश्वविक्रम श्र्लोकने करून बारामतीच्या नावलौकीकात भर घातलेली आहे.
दि 30 मे ते दि 3 जुन 2022 रोजी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी 96 तासाचे लार्जेस्ट स्केट मोटो फॉर्मेशन स्केटिंग आयोजन करण्यात आले. या विक्रमासाठी प्रमुख पंचामध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय मलजी यांची निवड करण्यात आली होती. विश्वविक्रम यशस्वी करण्याकरीता विजय मजलींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या विश्वविक्रमाकरीता श्र्लोक दोशी या खेळाडूने आपली उत्तुंग भरारी घेणारी कामगिरी दाखवीत बारामतीसह महाराष्ट्राचे नावं संपुर्ण देशात उंचावले आहे.