अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त 10 जून रोजी येथील राष्ट्रवादी भवनात सकाळी 10 वाजता झेंडावंदन होणार असून शहरात विविध भागात लोकहितार्थ कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रवादी वर्धापनदिन सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, नवनाथ बाबा रुपनवर, सचिन खामगळ, प्रफुल्ल पवार, सोमनाथ जावळे, अक्षय कोकाटे, सचिन जगताप, विठ्ठल महाडिक, सचिन शिरसाट, संजय देवकर, सुरेश कोकाटे, नानासाहेब भोईटे, गोविंद पाटोळे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तमाम कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केली आहे.