बारामती(वार्ताहर): 5 जून हस बारामती नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व माळेगाव कारखान्याचे विद्यमान संचालक योगेशभैय्या जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त इफ्तेखार आतार मित्र परिवारच्या वतीने बुके, केक, व इतर अनावश्यक खर्च टाळून मराठा महासंघ संचलित राजमाता जिजाऊ करइर सेंटर, जिजाऊ मंगल कार्यालय, भिगवण रोड, बारामती येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थीसाठी उपयुक्त अशी विविध पुस्तके भेट देण्याचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी बारामती सहकारी बँकेचे संचालक नामदेवराव तुपे, देवेंद्र शिर्के कु.कैशल तांबे,( 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघातील वर्ल्डकप संघातील खेळाडू) अथर्व योगेश जगताप व जिजामाता करइर सेंटर मधील सर्व स्टाफ तसेच आयोजक इफ्तेखार अन्सार आतार, अमीर आतार, संकेत जगताप, निखिल अहिवळे, साहिल सय्यद, अब्बु बागवान, ओंकार बनकर इ. उपस्थित होते.