बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील नामचीन गुंड रोहित केशव जगताप (वय-28, रा.कसबा, ता.बारामती) याच्यावर भादवि कलम 376 427 506 504 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. यापुढे कोणत्याही महिलेची कुणाविरुद्ध ही लैंगिक अत्याचाराची तक्रार केल्यास तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क करावा तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी केले आहे.
याबाबत हकीकत अशी की, बारामती येथील एका निर्भया महिला व तिच्या मुलाचे अपहरण करून मारून टाकण्याची धमकी देऊन तिला कोणी जवळचे नातेवाईक नाही हे पाहून व स्वतःची असणारी दहशत या जोरावर मोरगाव रोडच्या सिकंदरनगर भागात बोलून त्याठिकाणी काटेरी झुडपांमध्ये तिच्यावर दुपारच्या बारा वाजता लैंगिक अत्याचार केला. तेवढ्यावर त्याची शारीरिक भूक शमली नाही तर सदर निर्भया ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी येऊन परत त्या ठिकाणी गोंधळ करून त्याची इच्छा पूर्ती करण्याची मागणी परत केली असता, सदर पिडीताने नकार दिला असता तिच्या घरी जाऊन तिच्या दरवाज्याची तोडफोड केली. सदर महिलेने कोणतीही तमा न बाळगता सदर पोलीस स्टेशन गाठून बलात्कार केल्याचा हकिगत सांगितली पोलिसांनी सदर महिलेचा जबाब तात्काळ नोंदवून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक युवराज घोडके तसेच पोलीस हवालदार शिंदे, इंगळे हे करत आहेत.