माझा शत्रू हा व्यक्ती नसून, त्याच्यातील असलेले वाईट प्रवृत्ती शत्रू आहे – ऍड.राहुल मखरे

अशोक घोडके यांजकडून..
इंदापूर(प्रतिनिधी): माझा शत्रू हा व्यक्ती नसून, त्याच्यातील असलेले वाईट प्रवृत्ती म्हणजे खरा शत्रू असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल मखरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

ऍड. राहुल मखरे यांचा अभिष्टीचिंतन वाढदिवस सोहळा इंदापूर येथे पंचायत समितीच्या प्रांगणात पार पडला यावेळी ते बोलत होते.

यावेळी शकील सय्यद, नगरसेवक कैलास कदम, शिक्षक सोसायटीचे सदस्य सुहास मोरे गुरुजी, दीपक जाधव, पै.पांडुरंग मारकड, महेंद्र रेडके, बाळासाहेब सरवदे, अनिल अण्णा पवार, महेश लोंढे, महेश शिंदे अकलूज प्रशांत उंबरे इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मखरे म्हणाले की, माझा वाढदिवस हा कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे. माझे सर्व मित्र हे विविध पक्षातील जरी असले तरी आमचे ऋणाणूबंध कायम स्वरुपी मित्र म्हणून राहतील. आपण माणूस म्हणून वावरताना मानव हिताचा विचार केला पाहिजे.जगाला आता बुद्धांची गरज आहे. यावेळी आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणाले ENJOY THE STRUGGLE त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद म्हणाले की, राहुल मखरे यांना मिळालेल्या पदव्या म्हणजे सामाजिक कार्यातून केलेल्या कामाची पावती आहे. विचार पिठावर बसलेले सर्वच पक्षातले नेते एकत्र येणे म्हणजे निखळ मैत्रीची प्रतीक होय. सर्व राजकीय मतभेद विसरून आपण एकत्र आले पाहिजे आणि त्यासाठीचा हा पायंडा पडला पाहिजे असे मत व्यक्त केले.

गटनेते तथा नगरसेवक कैलास कदम यांनी राहुल मखरे यांच्या सोबतचे बालपणाच्या मैत्रीची आठवण व्यक्त केली. भीमा कोरेगाव या प्रकरणाला वाचा फोडण्याचा पहिला प्रयत्न राहुल मखरे यांनी केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसीम शेख यांनी केले तर सूत्रसंचालन नानासाहेब चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!