बारामती(वार्ताहर): येथील जाएटस् ग्रुप ऑफ सहेलीची प्रथम कौन्सिल मिटींग व सहेलीचा शपथविधी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यामध्ये बारामती जाएटंस् ग्रुप ऑफ सहेलीच्या अध्यक्षपदी सौ.पूजा प्रविण आहुजा यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी अध्यक्षा सौ.सुचेता वडूजकर यांनी कॉलर, पीन व चेअर देत नूतन अध्यक्ष यांना देवून शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी केंेद्रीय समिती सदस्य डॉ.आनिल माळी, माजी फेडरेशन अध्यक्ष डॉ.सुवर्णा माळी, उपाध्यक्ष ऍड. विकास पाटील, सेक्रेटरी स्नेहल कुलकर्णी, सहसेक्रेटरी ऍड.नितीन शिंगटे, 13 युनीट डायरेक्टर सुधीर कुलकर्णी, फेडरेशन आफिसर शिरीष शहा, जाएटस् ग्रुप फलटणचे पदाधिकारी इ. मान्यवर उपस्थित होते.
दि.17 एप्रिल 2022 रोजी बारामती भिगवण रोडवरील हॉटेल कृष्ण-सागर याठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला कै.रमणिक मोता व सौ.सुनंदाताई पवार यांचे वडिल मोहनराव भापकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी तीन युनीट आफिसर यांची नियुक्ती युनीट 14 च्या युनीट डायरेक्टर यांनी केली. यामध्ये पास्ट प्रेसिडेंट कल्पना मोता, फलटण ग्रुपचे शांताराम आवटे, प्रविण आहुजा जाएटंस् ग्रुप प्रथम मिटींग टू कॉल ऑडर योजनाताईंनी केले.
डॉ.आनिल माळी यांनी दीप प्रज्वलन करून सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. उपस्थितांनी स्वतःची ओळख करुन दिली व कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. आतिशय खेळीमेळीत कौन्सिल मिटींग संपन्न झाली. विशेष म्हणजे बारामती सहेलीच्या सर्व मेंबर्सनी उत्तम ड्रेसकोड, चांगले समाजोपयोगी कार्यक्रम राबविल्याने उपस्थितांनी कौतुक केले.
प्रथमत: सौ.सविता परकाळे, सौ.हेमा ओसवाल, सौ.वैशाली शहा या नवीन मेंबरचा शपथ विधी घेण्यात आला.

बारामती जाएटस् ग्रुप ऑफ सहेलीची नविन कार्यकारणी पुढीलप्रमाणे : अध्यक्षा सौ.पूजा आहुजा, उपाध्यक्षा सौ.उमा जोशी, सौ.कविता पंजाबी, सेक्रेटरी-सौ.वैशाली स्वामी, खजिनदार सौ.विभावरी देशपांडे, सांस्कृतिक मंत्री-सौ.पुनम गांधी, सौ.शारदा बेलपत्रे, सौ.मृदुल देशपांडे,सहलमंत्री सौ.भारती मुथा, क्रीडामंत्री स्नेहा गाढवे व सीमा टाटिया, आरोग्यमंत्री सौ. स्नेहा शहा, सौ.ऊज्वला कोठारी, मिडीया रिपोर्टींग सौ.सोनल दोशी यांची निवड झाली.
यावेळी आनुराधा जाचक, सौ.सारीका वडुजकर, जयश्री ओसवाल, तिलोत्तमा जाचक, सई सातव, प्रणिती गांधी, सुनीता आहुजा हे सहेली मेंबर उपस्थित होत्या.
या मिटींगच्या कार्यवाहक म्हणून सौ.वैशाली स्वामी यांची नेमणूक करण्यात आली होती. सुत्रसंचालन सौ. मृदुल देशपांडे यांनी केले. मागील वर्षीचा आहवाल वाचन सुवर्णा जोशी यांनी केले.
बारामती जाएटस् ग्रुप ऑफ सहेलीच्या माजी अध्यक्षा सौ.सुचेता वडूजकर यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी आभार नूतन सहसेक्रेटरी वैशाली स्वामी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.