जय हनुमान चालीसामध्ये हनुमानाचे संपूर्ण वर्णन व्यक्त केले आहे. त्यांनी केलेले पराक्रमाची मांडणी केलेली आहे. त्यामधील एक वाक्य आहे.
महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी
या वाक्याचा अर्थ हे महावीर बजरंगबली तू विशेष पराक्रमाचा आहेस. तुम्ही वाईट बुद्धी दूर करा, आणि चांगल्या बुद्धीचा साथीदार उपयुक्त आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे कधीही राजकीय सत्ता प्राप्त न करता आलेल्या मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे हे सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रकाशझोत्यात असतात.
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला पत्रव्यवहार करून कळविले आहे. भोंगे उतरविले नाही तर या भोंग्याच्या समोर जय हनुमान चालीसा म्हणण्यास सांगितल्याने समाजात हिंदू-मुस्लिम वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. जातीपातीच्या वादामध्ये आजपर्यंत कोणा-कोणाचा अंत झाला हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या आव्हानाला त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी सुद्धा मनावर घेतले नाही. काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकण्याचा विचार केलेला आहे.
जय हनुमान चालीसामध्ये चांगल्या बुद्धीला साथीदार बनवा, वाईट बुद्धी दूर करण्याचे सांगितले आहे. मनसेचे राजसाहेब ठाकरे यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे केलेले वक्तव्य जय हनुमान चालीसा मान्य करेल का? हा सुद्धा खरा प्रश्र्न आहे. कोंढवा येथील नुराणी कब्रस्तानमदील सुविधांचे लोकार्पण 2013 साली मनसे अध्यक्षांच्या हस्ते झाले होते. मात्र राज ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे मुस्लीम समाजामध्ये नाराजी पसरली आहे. राज यांनी आपल्या भाषणामध्ये मशिदींबरोबर अजान आणि मुस्लीम समजाचा अपमान केल्याचा दावा करत अज्ञातांनी या कब्रस्तानामधील विकासकामांच्या उद्घाटन शिलेवरील राज यांच्या नावाला काळं फासलं आहे.
पाच वेळा मशिदीत आजान (बाग) देतात याचा अर्थ राजसाहेब ठाकरेंना कळालेला नसेल असे दिसत आहे. यामध्ये असे सांगितले आहे की, नमाजचा वेळ झालेला आहे, हातातील काम सोडून नमाज पठण करा. लवकर या…लवकर या.. यामध्ये असे सांगितले नाही की, कोणत्या मंदिरातील घंटा वाजली की लगेच आजान सुरू करा किंवा मशिदीच्या बाहेरून हिंदू जात असतील तर आजान द्या असे सांगितले नाही. परंपरेने आजानचा विषय आलेला आहे. त्यास तडा जाणे म्हणजे भावनांना अंत पाहणे होईल. हिंदू-मुस्लिमच्या वादात कित्येक कुटुंब बरबाद झालेले आहेत. आजही काही कुटुंब त्याच्या झळा सोसत आहेत. त्या कुटुंबाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती पाहिली असता ते कुटुंब रसातळाला गेलेले आहे.
जय हनुमान चालीसामध्ये आणखीन एक वाक्य खुप महत्वाचे म्हटले आहे. मनसेचे राजसाहेबांनी या वाक्याबाबत हिंदू धर्मात जनजागृती करण्याची गरज आहे.
और देवता चित न धरई, हनुमत सेई सर्व सुख करई
जय हनुमानजी! तुमची सेवा केल्याने तुम्हाला सर्व प्रकारचे सुख मिळते, मग इतर कोणत्याही देवतेची गरज नाही.
समाजात जनजागृती करणे राहिले दूर आणि स्वत:चे ठेव झाकून दुसर्याचे बघतो वाकून असे झालेले आहे. एखाद्या मुस्लिम राजकीय, सामाजिक किंवा इतर क्षेत्रातील व्यक्तीने जर म्हटला राजसाहेब ठाकरे यांचे डीएनए चेक करण्याची गरज आहे यावर किती वादळ निर्माण होईल हे पाहणे गरजेचे आहे. नंगेसे खुदा डरता है त्यानुसार एखादा नागवा झाला तर त्याच्या समोर नागवे व्हावे लागते अन्यथा तो नागवा स्वत:च्या अब्रुबरोबर दुसर्याची अब्रु वेशीला टांगल्याशिवाय राहत नाही.
मुस्लिम समाज द्वेष,मत्सर, जातीवाद बाजुला ठेवून सन्मार्गाने एकोप्याने शिक्षणाची कास धरत समाजात वावरत आहे. त्यांनी कधीही हक्काचे हिसकावून घेतले नाही. दिले तर घेतले नाहीतर दोन-दोन दिवस उपाशी राहील एवढा स्वाभिमान त्याच्या अंगी आहे. राजकीय लोकांना काही मुद्दा मिळाला नाही तर मुस्लिमांवर घसरण्याशिवाय पर्याय नाही. अशा कृत्याबाबत मुस्लिम समाज कधीही प्रतिक्रीया देत नाही. तो आजही शांत आहे. इस्लामची ध्येय धोरण त्याला शांत ठेवत आहेत.