बारामती(वार्ताहर): डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया मार्फत ‘बौध्द धर्म’ या विषयावर रविवार दि.9 एप्रिल 2022 रोजी माता रमाई भवन, आमराई, बारामती याठिकाणी तालुकास्तरीय ऐतिहासिक भव्य निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धेला माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ व माजी नगरसेवक गणेश सोनवणे 10 हजार रूपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले आहे. अजिंक्य सरोदे व विशाल भोसले यांच्यातर्फे 5 हजार तर मूलनिवासी बारामती तालुका सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सचिन साबळे यांच्यातर्फे 3 हजार रूपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच उत्तेजनार्थ/सहभागी झालेबद्दल विशेष भेट वस्तू देण्यात येणार आहे.
या स्पर्धेला ऍॅड.बापूसाहेब शीलवंत, पिंटुभाऊ गायकवाड, अमर भोसले, शैलेश सोनवणे, राजेंद्र सोनवणे अनिल दणाने यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. स्पर्धा विनामूल्य असून, वयाची अट नाही. अधिक माहिती साठी संपर्क :- अनिकेत मोहिते 8999914437, सुमित साबळे 9284956767, भास्कर दमोदरे 8600558030, अभिलाष बनसोडे 9561824316 यांच्या संपर्क साधावा.