अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): तरंगवाडी-गोखळी 2 कोटीचा रस्ता, तरंगवाडी ओढ्यावरील 75 लाखाचा पुल तर 73 लाख गोखळी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकुण 8 कोटी 75 लाखाच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ शुक्रवार दि.18 मार्च 2022 रोजी सायं.5 वा. होणार आहे. उद्घाटनानंतर 6 वा गोखळी याठिकाणी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर हे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे माजी सदस्य प्रताप पाटील, मा.सभापती प्रविण माने, सदस्य अभिजीत तांबिले, पं.स.चे मा.सभापती प्रशांत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जि.नि.समितीचे सदस्य सचिन सपकाळ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.शशिकांत तरंगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, ग्रामपंचायत तरंगवाडीचे सरपंच कान्होपात्रा जाधव, उपसरपंच कांतीलाल तरंगे, गोखळी ग्रामपंचायतीचे सरपंच अलका पोळ, उपसरपंच सचिन तरंगे या मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास तरंगवाडी, गोखळी येथील पदाधिकारी, सदस्य, संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.