बालदिनानिमित्त आंतरशालेय स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

बारामती(वार्ताहर): चैतन्याज्‌ ऍकॅडमी आणि समीर वर्ल्ड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिना निमित्त आंतरशालेय विविध स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन यश प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरणाचा कार्यक्रम समीर वर्ल्ड स्कूलमध्ये नुकताच संपन्न झाला.

यावेळी बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.एन.पाटील, मोटार वाहन निरीक्षक श्री.केसकर, बारामती बिल्डर असोसिएशनचे माजी चेअरमन विक्रांत तांबे, माळेगाव कारखान्याचे संचालक अनिल तावरे, संस्थेचे चेअरमन आशपाक सय्यद व समीर सय्यद, चैतन्याज्‌ ऍकॅडमीचे आशिष खत्री, निलेश वळसे-पाटील, दिग्विजय सिंग इ. मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच समीर वर्ल्ड स्कूलमध्ये घेत असलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

आंतरशालेय स्पर्धेत रांगोळी, चित्रकला, प्रश्नावली, कला व हस्तकला घेण्यात आल्या. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील विविध शाळांतील 200 विद्यार्थ्यांनी यांनी सहभाग घेतला होता.

शाळा व्यवस्थापन समितीने आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली भोसले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!