बारामती(वार्ताहर): शाळा, कॉलेज, खासगी क्लास परिसरातील मुलींची छेडछाड रोखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. पो.ह.मोरे व पो.ह.भोईटे वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पणदरे एस.टी.स्टँडच्या आवारात गाड्या उभ्या करून सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारणार्या चार युवकांवर निर्भया पथकाद्वारे मुंबई पोलीस कायदाकलम 110,112 अन्वये कारवाई करण्यात आली.
गेल्या आठ दिवसात कित्येक युवकांना पालकांच्या समोर एकवेळ समज देवून तसेच तीन ते चार चोडप्यांना ताब्यात घेऊन त्यांचे पालकांच्या ताब्यात देवून सोडण्यात आले आहे.
शाळा, महाविद्यालयचे सुरू झाले आहेत. महाविद्यालयासमोरील रस्त्यावर होणारे वाद, महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर केले जाणारे विनोद, तासनं-तास रस्त्याच्या बाजूला गाड्या उभ्या करून गप्पा मारणारी टोळकी आणि कॉलेज प्रवेशद्वारात अतिक्रमण केलेल्या खाद्यपदार्थ्यांच्या गाड्यावर चालणारा धिंगाणा यावर उपविभागीय पोलीस अधिकार्यांचे निर्भय पथक करडी नजर ठेवणार आहे.