अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): प्रहार जनशक्ती पक्षाच्या इंदापूर तालुका युवा कार्याध्यक्षपदी विशाल कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र पुणे जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख पंकज नागनाथ अवघडे प्रधान व पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष बाबा साठे यांच्या हस्ते देण्यात आले.
नियुक्तीनंतर विशाल कांबळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बच्चू भाऊंचा वारसा घेऊन पुढे पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम व शेतकर्यांच्या व अंध-अपंगांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सेवा सेवा करण्याची संधी मला पक्षाच्यावतीने मिळाली त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो.
यावेळी या कार्यक्रमास दादासाहेब शेख, दादा कांबळे, नागनाथ कांबळे, सतीश मोरे, निलेश कांबळे, गुरुनाथ ईवरे, समाधान कांबळे, बाबूलाल शेख, सौरभ अर्जुन व गोतंडी गावचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.