अशोक घोकडे यांजकडून…
इंदापूर (वार्ताहर): दि.17 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वा. निरवांगी येथे राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते 10 कोटी 89 लाख रूपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभानंतर जिल्हा परिषद शाळा निरवांगी (ता.इंदापूर) येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी निरवांगी यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

सदरचा कार्यक्रम विविध प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी खालील विविध उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे.
- निमगांव केतकी-पिटकेश्र्वर-सराफवाडी-निरवांगी-खोरोची-पिठेवाडी-सराटी-लुमेवाडी-पिंळपरी-गिरवी-अडकेवस्ती-निरा नरसिंहपूर प्र.जि.मा.121 एकुण 10 कोटी रूपये,
- निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रसुतिगृह 10 लाख
- प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी निवासस्थान-30 लाख
- प्राथमिक आरोग्य केंद्र दुरूस्ती – 7 लाख
- बी.के.बी.एन. ते राऊत रस्ता कॉंक्रीटीकरण-10 लाख
- निरवांगी ग्रामपंचायत कार्यालय इमारत – 12 लाख
- पाणी टंचाई टाकी निरवांगी-20 लाख
- खुली व्यायामशाळा- 5 लाख
