विविध ब्रँडचा गुटखा जप्त : साडे आठ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

बारामती(वार्ताहर): विविध गुटखा घेऊन जाणार्‍या वाहनावर कारवाई करून तब्बल साडे आठ लाख रूपयांचा मुद्देमाल उपविभागीय पोलीस अधिकारी पथक व बारामती शहर पोलीसांनी जप्त करून आरोपीला अटक केली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुणवडी रोड सार्थक कलेक्शन शेजारी श्री दत्त ऑटोलाइन्स या दुकानासमोर गुटखा तंबाखू ने भरलेली क्वालिस गाडी उभी आहे अशी बातमी मिळताच त्या ठिकाणी छापा मारला असता. गणेश दत्तात्रय मदने(वय 25, रा.मळद, ता.बारामती) हा त्या ठिकाणी विविध ब्रॅण्डचा गुटखा विक्रीसाठी घेऊन आलेला होता दोन पंचांसमक्ष त्याच्यावर छापा मारून त्या ठिकाणी त्याची क्वालिस गाडी क्र चक10A ड1999 व विविध ब्रँडचा (विमल गोवा सौदागर व्ही-1) गुटख्याची बोरी मिळून आल्या. गाडीमधून तीन लाख 19 हजार रुपयांचा निव्वळ गुटखा, पाच लाख रुपये किंमतीची क्वालिस गाडी, दहा हजार रुपयांचा मोबाईल व 26 हजार रुपये गुटखा विक्रीतून आलेले पैसे असा साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर ढाकणे, सुनील मोटे, पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, कल्याण खांडेकर, कोठे. अभिजीत कांबळे दशरथ इंगवले व उपविभागीय कार्यालयाकडील कर्मचारी दराडे, साळवे, भोई यांनी केलेली आहे आरोपीला अटक करून दोन दिवसाचा पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे या गुन्ह्याला भादवि कलम 328 व अन्न सुरक्षा अधिनियम या प्रमाणे कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!