बारामती(वतन की लकीर ऑनलाईन): पुणे महापालिकेच्या मा.नगरसेविका ऍड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांनी दिनांक 3 फेबु्रवारी 2022 रोजी राजकीय महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचे विरुद्ध पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांचे न्यायालयात खटला दाखल केलेला आहे.
सदर प्रकरणात न्यायालयाने सदर प्रकाराची दखल घेऊन आरोपींवर कडक शासन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारू पितात,’ तसेच ’ढवळ्या शेजारी बांधळा पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, अशी मराठीत म्हण आहे. उद्धव ठाकरे यांना अजित पवारांचा गुण लागल्याने सरकारने दारू विक्रीचा निर्णय घेतला,’ अशा वादग्रस्त विधानाबाबत सर्वत्र बंडातात्या कराडकरचा निषेध केला जात आहे.
ऍड.पाटील ठोंबरे यांनी बोलताना सांगितले की, बंडातात्या कराडकर यांनी माफी मागावी. सुप्रिया सुळे या महिलांचं नेतृत्व करतात. त्यामुळे बंडातात्यांनी महिलांचा अपमान केलाय, त्यामुळे बंडातात्यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.
प्रस्तुत प्रकरणात फिर्यादी तर्फे ऍड.विजयसिंह ठोंबरे, ऍड. हितेश सोनार, ऍड.दिग्विजयसिंह ठोंबरे व विष्णू होगे हे काम पाहत आहे.