अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (वार्ताहर): राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ शेवते व प्रदेश मुख्य महासचिवपदी ज्ञानेश्र्वर सलगर यांची एकमताने निवड झालेबद्दल राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास पक्षाचे पश्र्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजित पाटील, सातारा जिल्हा प्रभारी खंडेराव सरक, पुणे जिल्हा प्रभारी आप्पासाहेब सुतार, सांगलीचे लक्ष्मण सरगर, उमाजी चव्हाण सांगली, सोलापूरचे रणजीत सूळ, फलटणचे संतोष ठोंबरे, पुणे जिल्हा प्रभारी किरण गोफणे, सतीश शिंगाडे, इंदापूर तालुका प्रभारी सतीश तरंगे, तानाजी शिंगाडे, शहाजी भाळे, बजरंग वाघमोडे, गणेश हेगडकर, माणिक मारकड, विजय इंगोले, आप्पा माने, नवनाथ कोळेकर, सचिन पलंगे, सागर रास्ते, तानाजी मारकड, राजू जानकर, आजिनाथ शेंडगे, शक्ती पालवे, अतुल शिंगाडे, दयानंद हेगडकर, समाधान काशीद, समाधान घोडके, अजिंक्य शेटे, किरण पारेकर, ज्योतीराम गावडे, सुरज कोकरे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी आभार सतीश तरंगे यांनी मानले.