कोणताही पक्ष असो त्याचा खरा आत्मा म्हणजे त्या पक्षाचा निष्ठावंत, तळमळीचा कार्यकर्ता होय. पक्षाच्या कार्यकर्त्याची तुलना त्या पक्षाच्या माध्यमातून विविध संस्थांवर उच्चपदस्थ असणार्यांशी होते हे कोणीही विसरू नये. कित्येक कार्यकर्ते तन-मन व धनाने पक्षामध्ये काम करीत असतात. काहींना तर एक प्रकारे त्या पक्षाचा शिक्काच बसलेला असतो. तो कार्यकर्ता सुख-दु:खात कुठे दिसला तरी त्यास त्या पक्षाच्या नावाने संबोधले जाते. तो कार्यकर्ता पक्षाचे व पक्षश्रेष्ठींचे विचार घेऊन समाजात काम करीत असतो. लोकशाहीचा आधार बळकट करणारे राजकीय पक्ष असतात. एकमेकांवर चिखलफेक करणार्यांमुळे राजकीय पक्षाबाबत सर्वसामान्य नागरीकांचे मत सकारात्मक राहिलेले नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहरातील निष्ठावंत कार्यकर्ते साधु रावसाहेब बल्लाळ हे गेल्या कित्येक वर्षापासून पक्षात इमाने-इतबारे काम करीत आलेले आहेत. त्यांना पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडली आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इ. निवडणूकांमध्ये स्टार प्रचारक म्हणून त्यांनी आजपर्यंत चोख भूमिका बजावली. पक्षाच्या विविध कार्यात सक्रीय सहभाग घेवून, पक्षात चुकीच्या पद्धतीने काम करणार्यांना सुद्धा सडेतोड उत्तर देणारे बल्लाळ आहेत. काही वर्षापूर्वी युवक पदावर संधी मिळण्यासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचामध्ये पक्षाचे कार्य काय असते ते सर्वांना बरोबर घेवून एकसंघाने काम करून दाखविले व युवक जागृती केली.
25 जानेवारी साधु बल्लाळ यांचा वाढदिवस साजरा झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना समाजकल्याण विभागाच्या पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. पक्षाने एका निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. उशिरा का होईना पक्षाने बल्लाळ यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना ज्या समितीवर आमदार, खासदार असतात अशा समितीवर त्यांच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करीत आलेले आहेत व करीत आहे.
साधु बल्लाळ हे ज्याप्रमाणे पक्षाचे काम करतात त्याचप्रमाणे ते एका साप्ताहिकाचे संपादक सुद्धा आहेत. प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवार शुभेच्छारूपी त्यांना येणार्या काळात चांगले पद मिळून पक्षाची, राष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळावी असे शुभेच्छा देत होते. मात्र, शेवटी त्यांना दक्षता व नियंत्रण समितीच्या जिल्ह्यावर काम करण्याची संधी मिळाली त्याचा आनंद मित्रपरिवाराला झाला.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीला अधिनियम 1989, अंतर्गत नोंद झालेल्या जिल्ह्यातील गुन्ह्यांची नोंद घेणे व करणे, संवेदनाक्षम भागात जाणे, भेटी देणे, सलोखा राखण्यासाठी उपाययोजना करणे, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाला वेळोवेळी देणे, अत्याचारग्रस्त व्यक्ती, कुटुंबाचे पुनर्वसन करणे या कामांचा सहभाग आहे. पद मिळताच बल्लाळ यांनी दौंड, इंदापूर, भिगवण, बारामती इ. पोलीस स्टेशनला बैठका लावून माहिती घेण्यास सुरूवात केली. समाजकल्याण विभागातर्फे असणार्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना कशापद्धतीने मिळेल याकडे सुद्धा त्यांनी जातीने लक्ष केंद्रीत केले आहे.
साधु बल्लाळ हे नुसते पद घेवून मिरविण्यातील नसून, त्या पदाला न्याय देणारे आहेत. त्यांनी यापुर्वी सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बारामती शहर युवक उपाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग इ. सारख्या पदावर काम करताना विविध उपक्रम राबविले. स्पष्टवक्तेपणा म्हणून त्यांनी वेगळी ओळख आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून साधु बल्लाळ यांची ओळख आहे. बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन त्यांना सतत लाभत असते. येणार्या काळात संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली ते आणखीन गगनभरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. बल्लाळ यांची निरीक्षण करण्याचे व माणसं ओळखण्याचे ज्ञान त्यांच्याकडे आहे. पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या माध्यमातून त्यांच्या हातून चांगली कामे व्हावी हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रांनी दिलेल्या शुभेच्छा आहेत.