निंबाळकर कुटुंबीयांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

बारामती(उमाका): सणसर गावचे माजी पोलीस पाटील आणि शरयू फौंडेशनचे जेष्ठ सदस्य पै.राजेंद्र विनायक निंबाळकर (वय 66) यांचे 7 जानेवारी 2022 रोजी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या इंदापूर तालुक्यातील सणसर येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन निंबाळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

पै.राजेंद्र निंबाळकर यांचा सणसरमधील विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग असे. प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास पवार आणि शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांचे निकटवर्ती होते.

शरयू फौंडेशनच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. काही दिवसांपूर्वीच त्यांचे लहान बंधू जगदीश निंबाळकर (वय 63) यांचेही निधन झाले आहे.

या भेटीप्रसंगी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील तसेच निंबाळकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!