जळोची(वार्ताहर): शिक्षण पूर्ण झाल्यावर इतरांवर अवलंबून न राहता स्वतः आर्थिक स्वावलबन झाल्यावर माहेर व सासर या दोन्ही कडे महिलांनी इतर महिलांचे आर्थिक सक्षमीकरणसाठी पुढाकार घ्यावा असे मत नगरसेविका डॉ. सुहासिनी सातव यांनी केले.
मेसाई व्यवसाय प्रशिक्षण संस्था व श्रद्धा ब्युटी पार्लर यांच्या वतीने बेसिक ब्युटीशीयन हा व्यवसायीक अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल व प्राविण्य प्राप्त प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव कार्यक्रम सोमवार दि 17 जानेवारी रोजी संपन्न झाला या वेळी डॉ.सातव बोलत होत्या.
या प्रसंगी बारामती नगरपरिषदच्या पाणीपुरवठा सभापती अनिता जगताप, आरोग्य सभापती सूरज सातव, राष्ट्रवादी शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा अनिता गायकवाड, सचिव रेहाना शिकीलकर, रेश्मा ठोंबरे, वैष्णवी गायकवाड, सायली भोसले, सुनील पवार, तन्या पवार आदी मान्यवर उपस्थीत होते.
महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असेही डॉ सुहासिनी सातव यांनी सांगितले. बालका पासून ते ज्येष्ठा पर्यंत प्रत्येकास सुंदर दिसावे वाटते त्यामुळे सौंदर्य क्षेत्रात मुली महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास वाव असल्याची माहिती तन्या पवार यांनी दिली.
उपस्थितांचे स्वागत सुनील पवार यांनी केले तर आभार मेसाई संस्थेच्या वतीने मानण्यात आले. प्रथम क्रमांक शबनम शेख द्वितीय-सुमन भोसले व तृतीय विभागून निकिता खांडेकर व प्रेरणा होळकर याना देण्यात आला तर सारिका डोईफोडे, हर्षदा घाडगे, दीपा चव्हाण, वर्षा देवकुळे, अनुराधा साळुंके, मयुरी चव्हाण, निकिता ढोबळे आदींनी सहभागाबदल गौरविण्यात आले.