श्री महाकाळेश्वर दिनदर्शिका 2022 प्रकाशन सोहळा संपन्न : प्रथम उपक्रमांचे नागरीकांमधून स्वागत

बारामती(वार्ताहर): जळोची येथील श्री महाकाळेश्वर देवस्थानच्या नावाने प्रथमच दिनदर्शिका प्रकाशित झाल्याने नागरीकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

दि.10 जानेवारी 2022 रोजी महाकाळेश्वर मंदीर जळोची येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, नगरसेवक अतुल बालगुडे, नगरसेविका सौ.आशा माने, सौ.संगीता सातव, दूध संघाचे माजी व्हा.चेअरमन प्रताप पागळे, पं.स.चे गटनेते दिपक मलगुंडे, दत्तात्रय माने, धनंजय जमदाडे,गणपत सुळ, भगवान मलगुंडे, नवनाथ मलगुंडे, महेंद्र सातकर, नाना जमदाडे,रमेश मासाळ, तानाजी सातकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.नवनाथ मलगुंडे यांनी केले तर आभार स्वप्निल कांबळे यांनी मानले. श्री महाकाळेश्वर दिनदर्शिका श्री.स्वप्निल कांबळे व डॉ.नवनाथ मलगुंडे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित नागरीकांना दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!