घातल्याशिवाय घाव, मिळत नाही वाव, गरीबांसाठी लढतो बारामतीचा तानाजीराव असे अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून राजकीय,सामाजिक व पत्रकारीतेत सक्षम भूमिका बजाविणारे तानाजी गौतम पाथरकर आहेत. नविन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे त्यांचा वाढदिवसानिमित्त…

बारामतीच्या विकासात सर्व समाज घटकांचा अमूल्य वाटा आहे त्यामध्ये तानाजी पाथरकर दोन पाऊल पुढे आहेत. कष्टकरी, श्रमिक, गोर-गरीबांचे प्रश्र्न मांडणारे व त्यांच्या न्याय व हक्कासाठी भांडणारे गरीबांचे नेतृत्व म्हणजे तानाजी पाथरकर यांचेकडे पाहिले जाते. सध्या त्यांच्याकडे झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या राज्याचे संघटक पदाची जबाबदारी आहे.

त्यांचा हक्क व कर्तव्यासाठी सतत लढा असतो. दलितवस्तीचा निधी दलितवस्ती मध्ये खर्च झाला पाहिजे. झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका ते मांडत आलेले आहेत. बारामतीत प्रखर विरोध करण्याची वेळ असताना त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची कास धरत बारामती शहर अध्यक्ष पदाच्या माध्यमातून समाजहिताच्या मुद्द्यावर विरोध केला.

गोरगरीब, कष्टकरी व झोपडपट्टी वासीयांसाठी न्याय व हक्क व योजनांसाठी प्रयत्न करणारे व वेळप्रसंगी आंदोलनाचा पावित्रा घेणारे तानाजी पाथरकर आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना प्रस्थापितांच्या विरोधात एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष बारामतीमधील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून गनला जावू लागला.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बारामती शहरात बसला पाहिजे. मांग-गारूडी समाजाला समाज मंदिर मिळाले पाहिजे. मुस्लिम समाजाचे मुलभूत प्रश्र्न सुटले पाहिजे. शहरामध्ये होणार्या विकासात्मक कामाचा दर्जा राखला गेला पाहिजे यासाठी वेळोवेळी आंदोलने करून प्रशासनाला धारेवर धरणारा नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.
विरोधाला विरोध न करता विरोधकाची ठाम भूमिका त्यांनी मांडली. झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून लोकनेते भगवानराव वैराट साहेब यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी वासीयांना न्याय मिळवून देणेकामी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी विविध आंदोलने करून सर्वसामान्य कुटुंब न्याय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
लॉकडाऊनच्या काळात हातावरचे पोट असणार्या कष्टकर्यांची बिकट अवस्था झाल्याचे पाहून त्यांनी मागासवर्गीय भागात शिवभोजन थाळी सुरू केली. दुर्लक्षित भागातील मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणून नगरपालिकेत पाठपुरावा केला. याबाबत वेळोवेळी त्यांचे मुखपत्र साप्ताहिक निर्भिड बारामती या वृत्तपत्रात वाचा फोडली.
पत्रकारांना पत्रकार भवन मिळावे म्हणून त्यांनी आंदोलन करून आपली भूमिका मांडली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीला घरे मिळाली पाहिजेत. मांग-गारूडी समाजाला समाज मंदिर, आण्णाभाऊ साठे स्मारकासह महात्मा फुले, अहिल्यादेवी होळकर, उमाजी नाईक, शाहू महाराज यांचे पुतळे बारामती शहरात झाले पाहिजेत यासाठी वेळोवेळी आवाज उठविला.
निर्भिड बारामतीचा संपादक, राजकीय पक्षाचा बारामतीचा माजी शहराध्यक्ष, एक उत्तम वक्ता, कष्टकरी श्रमिक, गरीब जनतेचा नेता अशा विविध भूमिका पार पाडत असताना त्यातून एकच ध्यास असतो तो म्हणजे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे.
विकासात्मक शहरात झोपडपट्टी वासीयांना मुलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत अशी आशा धारणार्या तळमळीच्या नेत्याला वाढदिवसाच्या लाख..लाख..शुभेच्छा!