अशोक घोडके यांजकडून….
इंदापूर(वार्ताहर): सौ.रेहाना मुलाणी यांच्या कामाची दखल घेत व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी वेळोवेळी दिलेले योगदान पाहता त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
या निवडीचे पत्र पक्षाच्या विद्यमान पुणे जिल्हाध्यक्षा सौ.भारती शेवाळे, पुणे जिल्हा निरीक्षक सौ.कविता अल्लाट, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.डॉ.वर्षा शिवले, बारामती तालुका महिला अध्यक्षा सौ.वनिता बनकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
सौ.मुलाणी या पक्षाच्या प्रत्येक घडामोडीत सक्रीय सहभाग घेत असतात. महिलांचे प्रश्र्न वेळोवेळी मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणूकांमध्ये सहभागी होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विचार तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले आहे. या सर्व कामातून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.
फेरनिवड प्रसंगी त्यांनी सांगितले की, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व पक्षाच्या नेत्यांचे कार्य विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांच्या न्यायासाठी जे काय प्रयत्न करीत आहे ते सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहचविण्याचा मनोमन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.