शारदानगर(वार्ताहर): पदवी व पदव्युत्तर सूक्ष्मजीवशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींसाठी मायकोरायझा आयसोलेशन व रूट कलोनायझेशन स्टडीज इन प्लांट्स या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या डीबीटी योजनेतून पदवी व पदव्युत्तर विद्यार्थिनींना बदलत्या जगाशी सुसंगत पध्दतीने विविध कौशल्याधिष्ठित असावी यासाठी चेअरमन राजेंद्र पवार व विश्वस्त सौ.सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतुन ही कार्यशाळा घेण्यात आली.
महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व वरिष्ठ पीएचडी संशोधक प्रा.सौ.आरती शेवते-लोणकर यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व वनस्पतीशास्त्र विषयाच्या 47 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यामधून मायकोरायझा संकलन, विलगीकरण,ओळखणे, मुळांवरील त्यांचे सहजीवन तपासणे इत्यादी तंत्राबद्दल प्रत्यक्ष प्रयोगातून विद्यार्थिनींना कौशल्य शिकवण्यात आले. याचे प्रशिक्षण प्राध्यापक शेवते यांनी दिले.
या प्रशिक्षण कार्यशाळेत मा.प्राचार्य डॉ.एस.जे.साठे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.महामुनी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्री.डावखर, श्री. भोसले, श्री. बंडगर, श्री. वळकुंदे, प्रा.स्नेहा माने, प्रा.पवार, प्रा.निकुळे, प्रा.गावडे, प्रा.आर. बी.देशमुख, प्रा.डॉ.आर.जे. मराठे यांनी विशेष परिश्रम घेतले.