बारामती(वार्ताहर): 30 पोटी रेशनिंगचा माल शासकीय बरदना बदलून खाजगी बारदानामध्ये भरलेला आहे व खुल्या बाजारात शेतकर्यांकडून खरेदी केल्याचे दाखवून विक्रीसाठी चाललेला टेम्पोवर बारामती शहर पोलीसांकडून कारवाई करून एक लाख 68 हजाराचा माल जप्त करण्यात आला.
छोटा हत्ती एमएच 42 एक्यू 5805 चा चालक वैभव भारत दनाने (रा.तांदुळवाडी रोड बारामती) याच्याकडे बिलाबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेही बिल मिळाले नाही. त्यानंतर सदरचा माल किराणा दुकानदार वसंत सोमनाथ पोटी (रा.खाटीकगल्ली) याचा असल्याचे त्यांनी सांगितले त्याच्याकडे सुद्धा पोलिसांनी मालक खरेदीच्या पावत्या विचारले असता उद्यापर्यंत त्यांनी कोणत्याही पावत्या हजर करून दिलेल्या नाहीत.
सदर आरोपी यांनी स्वस्त धान्य याबाबत असलेल्या शासनाच्या व माननीय जिल्हाधिकारी यांच्या कंट्रोल ऑर्डरचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे सदर दोन्ही आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. सदर बाबत पुरवठा विभागाची मदत घेऊन सखोल चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकारे शासकीय बारदाना बदलून धान्य खाजगी बारदाना भरून मार्केट मध्ये विकले जाते याबाबत शोध घेऊन यापुढेही कारवाया करण्यात येणार आहेत. धान्याची बिले जर खोटी असतील तर त्याबाबत ही कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक,पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, पो.ना.दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण व पवार यांनी केलेली आहे.
अशाप्रकारे कित्येक माल परस्पर विक्री व बदलला जातो यावर पोलीस निरीक्षक महाडीक यांनी करडी नजर ठेवणे गरजेचे आहे.