महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी रोहीत बनकर

बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी बारामतीचे रोहीत बनकर यांची नियुक्ती करण्यात आली.

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा गृहमंत्री (छत्तीसगड) ताम्रध्वज साहु यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास काळी यांनी श्री.बनकर यांना नियुक्ती पत्र दिले.

नुकत्याच यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई येथील टिळक भवन प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात पक्ष संघटनेतील उल्लेखनीय कार्य पाहता श्री.बनकर यांची ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदा वर नियुक्ती केली आहे.

यावेळी कॉंग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, ओबीसी प्रदेश प्रभारी व माजी मंत्री सुनिल देशमुख, पुण्याचे माजी आमदार व महापौर दिप्ती चौधरी तसेच प्रदेश सचिव इ. पदाधिकारी तसेच बारामती येथुन बारामती शहर युवकाध्यक्ष योगेश महाडीक, सुरज भोसले, राहुल गाढवे, प्रितम तपकिरे, अमीर पठाण इ. कार्यकर्ते उपस्थित होते. रोहीत बनकर यांच्या निवडीची वार्ता कळताच त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!