मयत भाजी विक्रेते फारूक (चाचा) तांबोळी यांच्या कुटुंबीयांना लोकवर्गणीतून मदत

बारामती(वार्ताहर): विकृत गुंड हल्लेखोराच्या खूनी हल्ल्यात जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या भाजी विक्रेते फारूख(चाचा) तांबोळी यांना सामाजिक कार्यकर्ते व पोलीस प्रशासनाने आर्थिक मदतीचे आवाहन केल्याप्रमाणे 1 लाख 39 हजार 100 रूपयांचा निधी त्यांचे कुटुंबियातील पत्नी, तीन मुली, एक मुलगा यांच्या सुपूर्द करण्यात आला.

24 नोव्हेंबरला उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे व बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या हस्ते कुटुंबीयांना रोख रक्कम स्वरुपात मदत देण्यात आली.

पित्रुछत्र हरवले, घरचा आधरवड गेला. चार मुले आनाथ झाली. तसेच या कुटुंबाला आजच्या घडीला उदरनिर्वाहचे कुठलेही साधन नाही हे लक्षात घेता नागरीकांनी नागरिकांनी मदत म्हणून गुगल-पे, फोन-पे, आणि रोख स्वरूपात सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे रक्कम जमा केली. यावेळी मानवी हक्क सामाजिक कार्यकर्ते मुनीर तांबोळी, चिऊशेठ जंजीरे, दादा धवडे, आरीफ तांबोळी, सागर इंगले, अरबाज तांबोळी, अक्कुभाई बागवान, बबलु शेख, तसेच तांबोळी जमात बारामतीचे जावेद तांबोळी, असलम तांबोळी, युसूफ तांबोळी, इम्रान तांबोळी, अफजल तांबोळी, बशीर तांबोळी या सर्व पदाधिकारी यांच्यासह लक्ष्मीनारायण नगरचे रहीवाशी व इतर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!