बारामती(वार्ताहर): येथे भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्यातर्फे मासिक सभा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ऍड.कैलास पठारे पाटील उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे, दि पुणे लॉयर्स कंझ्युमर को. ऑप.सोसायटी पुणेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक ऍड.पांडुरंग ढोरे पाटील, पुणे वकील बार आसोसियशनचे उपाध्यक्ष व संघाचे कायदेशीर सल्लागार ऍड.योगेश तुपे पाटील, पुणे शहराध्यक्ष देविदास बिनवडे, पुरंदर तालुकाध्यक्ष सिकंदर नदाफ, दौंड तालुकाध्यक्ष सुभाष कदम, बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
उपस्थित पत्रकारांना संघाचे सिकंदर नदाफ, सुभाष कदम, विनोद गोलांडे, ऍड.योगेश तुपे, देविदास बिनवडे, ऍड.कैलास पठारे पाटील आदींनी मार्गदर्शन केले. तसेच कुटुंब कल्याण कोषाची माहिती स्वप्निल गायकवाड यांनी दिली.
याप्रसंगी भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी तैनुरभाई शेख यांची तर बारामती तालुका कार्याध्यक्षपदी विकास कोकरे यांची निवड करण्यात आली. भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेऊन संघाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे तैनुरभाई यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ पिंगळे, सूत्रसंचालन संदीप बनसोडे यांनी तर आभार सोमनाथ जाधव यांनी मानले. यावेळी बारामती, दौन्ड व पुरंदर तालुक्यातील संघांचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. सदरची कार्यशाळा हॉटेल सुदीत, बारामती याठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.